
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
दवलामेटी :-दवलामेटी (प्र)श्री साईनाथ कॉन्व्हेन्ट, श्री साईनाथ कॉलेज ऑफ फार्मसी आणि दवलामेटी ग्रामपंचायत यानी संयुक्त पने दिली भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन.
नॉलेज ऑफ सिम्बॉल उपाधी मिळालेले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबील साठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता . हि बाबासाहेबांची पुण्यायी आहे की आज हिंदू समाजातील स्त्रियांना शिक्षण, वारसाहक्क व यासारखे अनेक अधिकार मिळाले. येत्या काही दिवसांत बाबासाहेबांनी लिहलेले सर्व पुस्तके आम्ही आमच्या शाळेतील ग्रंथालयात विद्यार्थि व परिसरातील वाचकांसाठी उपलब्ध करू असे वचन स्व. मेघराजजी ओझा स्मृती शिक्षण संस्था चे सचिव श्रीमान पि.के. सिन्हा जी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दवलामेटी ग्रामपंचायत चा सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ग्रामपंचायत सरपंच रिताताई उमरेडकर व मान्यवरांनी र्पुष्पहार अर्पण करून सर्व प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या प्रसंगी दोनशे बालकांना पुस्तके आणि अल्पोहर स्व. मेघराजजी ओझा स्मृती शिक्षण संस्था तर्फे वितरित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दवलामेटी ग्राम. प. सरपंच सौ रीता ताई उमरेडकर या होत्या. प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे संचालक व सचिव श्रीमान पि. के सिन्हा सर होते तसेच प्रामुख उपस्थीती ग्रामविकास अधिकारी विष्णू जी पोटभरे, शेखरकुमार सर, महेश ठाकूर सर, ग्राम पंचायत सदस्य प्रकाश मेश्राम, अर्चना बनसोड, शुभांगी पाखरे, साधना शेंद्रे, रक्षा सुखदेवे, अर्चना चौधरी, उज्वला गजभिये, यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मुख्यध्यापक रविंद्र पाखरे सर यानी केले. या प्रसंगी मोठया संख्येने बालक, पालक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.