
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक.०५/०४/२०२२ ला दुपारी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान पत्राळी व द्रोण बनविण्याच्या कारखान्यात आग लागली याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे वाहन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि आग विझविण्याची प्रक्रिया सुरू केली.काही प्रमाणात आग विझली असून आणखी आग विझविण्याची प्रक्रिया सुरुच होती. यात कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही.परंतु चिमूर शहरातील माणिक नगर येथे अनेक वर्षांपासून हे अनाधिकृत रित्या कमी मायक्रोन च्या पंनी तसेच पंनी पासून तयार करण्यात आलेल्या पत्राळी तसेच द्रोण बनविण्याचे कारखाने सुरु आहे.
यावर शासनाने बंदी घातली असून नियमाला धाब्यावर बसवून सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन करून काही व्यावसायिक यांचा व्यवसाय जोमाने सुरूच आहे.सध्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाल्याने याची बाजारात मागणी सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहे.परंतु या व्यवसायास बंदी असतांना चिमूर शहरात कारखाना सुरू आहे याची माहिती नगर परिषद ला असतांना सुध्दा कारवाई करण्यात का येत नाही असा ? जनतेला पडलेला आहे.मागील वर्षी सुद्धा माणिक नगर येथील पत्राळी व द्रोण बनविण्याच्या कारखान्याला आग लागली होती.त्या लागलेल्या आगीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.