
अंतराळ विभाग तज्ञाकडे सोपविणार अवशेष
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-जिल्ह्यातील 2 एप्रिल पासून विविध ठिकाणी सॅटॅलाइटचे अवशेष आढळले दिनांक 5 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात पाच ठिकाणी अवशेष सापडले त्यात धातूची रिंग तथा 4 गोळ्या चा समावेश आहे,
आज दिनांक 6 एप्रिल ला चिमूर तालुक्यातील खडसंगी वनपरिक्षेत्रात अंतर्गत तळोधी बीटातील कक्ष क्रमांक 45 मधील वन तलावाजवळ वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, आपल्या सहकार्या सह नियमित गस्त घालीत असताना तलावात विचित्र अशी वस्तू दिसल्याने त्याला बाहेर काढले असता जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेल्या सॅटलाईट चे अवशेष असल्याचे समजले,
त्यानी ही माहिती चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सांगळे यांना देऊन हा अवशेष त्यांच्या कडे सोपविण्यात आले,सध्या स्थितीत हा अवशेष चिमूर पोलीस स्टेशन इमारतीमध्ये ठेवण्यात आला असून अंतराळ विभागातील तज्ञ आल्यानंतर त्यांचे कडे हा अवशेष सोपविण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सांगळे यांनी दिली आहे,