
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- दिनांक.११/०४/२०२२ चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था मर्या , शाखा चिमूर यांचातर्फे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून चना घेण्यास नकाराची भूमिका सुरु आहे याबाबतची शेतकऱ्यांतर्फे माहिती मिळाली असता.या संस्थेनी शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्ज तसेच सातबारा घेण्यात आली असून एफ.सी.आय. च्या गोडावून च्या समस्सेमुळे शेतकरी बांधवांची दिशाभूल करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे.
यामुळे शेतकरी मोठ्या संकटात अडकला आसून शेतमाल खराब झाल्यास यास जबाबदार पूर्णपणे हि संस्था राहील यामुळे शासनाने याकडे गांभिर्याने लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवायला हव्या अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आंदोलन छेडण्यात येईल असेही रमेश खेरे राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल तालुका अध्यक्ष यांनी बोलले.