Breaking News

राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी नागपूर दौऱ्यावर

 

 

नागपूर, दि. 18 : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 23 एप्रिलला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शहरातील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) नवीन कॅम्पसचे उद्घाटन करणार आहेत.

दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे : राष्ट्रपतींचे शनिवार, दि. 23 एप्रिलला दुपारी 1 वाजता नागपूर विमानतळावर विशेष विमानाने आगमन. त्यानंतर राजभवन येथे राखीव. सायंकाळी 5 वाजता भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या कायमस्वरुपी कॅम्पसचे राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते उद्घाटन. रात्री राजभवनात मुक्काम.

रविवार, दि. 24 एप्रिलला दुपारी 1.30 वाजता नागपूर विमानतळावरुन नांदेड विमानतळाकडे प्रयाण. त्यानंतर दुपारी 4 वाजता उदगीर (जि. लातूर) येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थिती.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपुर चे माजी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या वडिलांचे निधन

केळापूर,( वर्धा) येथे रविवारी होणार अंत्यसंस्कार   नागपूर दिनांक ३० : आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त …

नागपुरात आढळले स्वाईन फ्लू चे १६ रुग्ण

नागपूर, ता. २७ : कोव्हिड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved