Breaking News

चिमूर तालुक्यातील आंबोली पं. सं.क्षेत्रातील पुयारदंड गावात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालय व शाखेचे उद्घाटन

= शाखेतर्फे जनतेसाठी पाणपोई सुविधा

= भिसीतील टायगर ग्रुपच्या काही सदस्यांचा व राजमुद्रा प्रतिष्ठान ग्रुप पुयारदंड यांचा शिवसेनेत प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी चिमूर तालुक्यातील आंबोली पंचायत संमिती क्षेत्रा मधे पुयारदंड गावात विभाग प्रमुख राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय तथा शाखा उद्घाटन करून जनतेसाठी पाणपोई सुविधा शाखा पुयारदंड च्या वतीने चालू करण्यात आली. या उपक्रमात भिसी नगरातील सक्रिय टायगर ग्रुपच्या काही इच्छुक युवकांनी व पुयारदंड येथील राजमुद्रा प्रतिष्ठान च्या सर्व सदस्यांनी चंद्रपूर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश घेतला.

यावेळेस शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे, युवा सेना जिल्हा सरचिटणीस तथा,शिवसेना वरोरा तालुका संघटक मनीष मुरली जेठानी, उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते,तालुका प्रमुख बाळूभाऊ सातपुते,चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोंबरे,तालुका संघटक रोशन जुमडे,विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, युवासेना उपजिल्हा प्रमुख राज बुच्चे भिसी शहर प्रमुख नाना नंदनवर, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख सुनिल हिंगणकर व सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली.

 

 

या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा प्रमुख यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन चिमूर परिसरातील आंबोली क्षेत्रात येणाऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळवायचे असेल तर प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा व घर तिथं शिवसैनिक झाल्याशिवाय आपण आपल्या पक्षाला बळकटी येणार नाही असे वक्तव्य करीत सर्वांना पक्ष वाढीसाठी व शाखा उदघाटन साठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व पदाधिकारी यांनी आपल्या भाषणतून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे आश्वसन देत समोरील शाखा उदघाटन साठी शुभेच्छा दिल्या.यावेळी भिसी, पुयारदंड,गडपिपरी, आंबोली, चिचाळा शास्त्री, लावारी परिसरातील सर्व शिवसैनिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved