
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-वनविभागाच्या खांद्याला खांदा लावत वनसंरक्षण व वनसंवर्धन ही आपली जिम्मेदारी समजून वन विभागाचे प्रतिनिधी नेचर गाईड हे प्रामाणिकपणे आपली ड्युटी बजावत असतात, त्याच कालावधीत वनविभाग हे नव नवीन नियम लादून नेचर गाईड ना हैराण करण्याचे कार्यक्रम मात्र सुरूच असते नेचर गाईड च्या विविध विषयावर विविध मागण्यांवर अभयारण्या गाईड कर्मचारी संघाकडून सिस्ट मंडळामार्फत व वारंवार पत्राद्वारे नेचर गाईडच्या मागण्या वनविभागाच्या लक्षात आणून देण्यात आले आहे,
तरीसुद्धा वनविभाग हेतुपुरस्कर नेचर गाईडच्या मागण्याकडे लक्ष देताना दिसत नाही व अभयारण्याच्या शेजारी असणारे पूर्वीपासून जमीन कसणारे लोकांना अतिक्रमण सोडा नाहीतर काम सोडा अशा अन्याय कारक गोष्टीसाठी अभयारण्य गाईड्स कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेश कडून अश्या विविध मागण्यासाठी संघटनेकडून एक दिवसीय तीव्र धरणा आंदोलन करण्यात येत आहे अशी माहिती अ. गा. क. संघ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष पवन कनोजे , कार्याध्यक्ष संजय सहारे
सचिव निलेश मेंढे यांच्याकडून मिळाली आहे,
धरणे आंदोलन चे दिवस व वेळ दिनांक11/5/2022 रोज बुधवार ला मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयासमोर घेण्यात येत आहे.