
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-वरोरा तालुक्यातील बारव्हा गट ग्रामपंचायत अंतर्गत बोपापूर( बोडखा ) या गावांमध्ये अति पावसामुळे सहा घर पडले आहे, यांची माहिती देण्यासाठी ग्रामवासी आकाश धोटे यांनी तलाठी टिपले यांना फोनद्वारे सवांद साधून पडलेल्या घरांची माहिती दिली,
तलाठी टिपले यांनी घटनास्थळी न येता फोन द्वारे पंचनामे केले त्यामुळे गावातील काही नागरिकांना पटले नाही त्यामुळे आकाश धोटे यांनी शिवसेना मीडिया तालुका प्रमुख वरोरा गणेश चिडे यांना तलाठी टिपले बद्दल माहिती दिली,
त्यामुळे गणेश चिडे यांनी तलाठी टिपले यांना कॉल द्वारे सवांद साधून मॅडम गरीब जनतेचे घर पडत आहे त्यामुळे घटनास्थळी जाऊन पंचनामा करा अशी माहिती दिली, नेहमी विवादीत असलेल्या तलाठी टिपले एक महिला असून फोनद्वारे गणेश चिडे यांच्याशी अरेरावीची भाषा केली.
मी माझं काम कसही करेल, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घाबरत नाही तुम्ही मला शिकवू नये, जे करायच आहे ते करा मला जनतेची कारणे नेहमीचे असतात त्यांच्याच मागे धावायचं काय. अश्या भाषेत तलाठी टिपले गणेश चिडे यांना बोलली,
तेव्हा गणेश चिडे यांनी तलाठी टिपले यांच संभाषण रेकॉर्ड करून करून ठेवलं व कायद्यावर विश्वास ठेऊन तहसीलदार मॅडम वरोरा यांच्या कडे निवेदनाद्वारे तक्रार केली, काही विवादित कर्मचारी सामान्य जनतेशी अशे जर वागत असेल त्यांना जर न्याय मिळत नसेल अश्या अधिकारी वर कार्यवाही झालीच पाहिजे अशी मागणी शिवसेना मीडिया प्रमुख गणेश चिडे यांनी निवेदनद्वारे केली.