
अमर शहिदांना श्रद्धांजली अर्पण
तालुका काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमूर येथे क्रांतिदिन व आजादी गौरव पदयात्रा हुतात्मा स्मारक येथुन शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्ताने पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले, व चिमुर शहरात चिमुर विधानसभेचे नेते तथा माजी अध्यक्ष जि.प. डॉ. सतिश वारजुकर यांचे उपस्थित हुत्तामा स्मारक पासुन
ते मेन रोड मार्ग, डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व राष्ट्रांत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नेहरू चौक , मार्केट लाईन , अभ्यंकर मैदान येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून एस बी आय मार्ग , मेन रोड, डोंगरावार चौक येथे शहीद बालाजी रायपुरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि मेन रोड मार्ग तालुका काँग्रेस कार्यालयात पदयात्रा समारोप करण्यात आली,
यावेळी तालुका काँग्रेस,तालुका महिला काँग्रेस, शहर काँग्रेस, शहर महिला काँग्रेस, तालुका युवक काँग्रेस व युवती काँग्रेस व संपुर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.