
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे यांनी आपल्या कार्यकाळात न्याय देण्याचे कार्य केले. शांततेच्या मार्गाने त्यांनी प्रशासकीय कामे केलीत ते त्यांचे कडून शिकण्यासारखे आहे. माझं गाव समजून गावातील वातावरण कसं शांत राहील असे सांगळे साहेबांचे आहे.३२ वर्षाचा अनुभव असलेले संजय सांगळे चिमूर साठी १० महिन्यासाठी लाभले असून दिर्घायुष्य लाभो यासाठी चिमूर क्रांती भूमी कडून परमेश्वराकडे आशीर्वाद देत शांतता ठेवण्यात यशस्वी व्यक्तिमत्त्व संजय सांगळे असल्याचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी व्यक्त केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे यांच्या निरोप व सत्कार कार्यक्रम प्रसंगी आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते.
याप्रसंगी वसंतभाऊ वारजुकर भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे,भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, घनश्याम डुकरे ,गोपाल बलदुवा, प्रा संजय पिठाडे, सुभाष शेषकर ,पाथरी ठाणेदार मंगेश मोहोड ,शेगाव ठाणेदार मेश्राम ,भिसी ठाणेदार राऊत पोलीस अधिकारी मंचावर उपस्थित होते.
सेवानिवृत्त अधिकारी संजय सांगळे यांनी निरोप व सत्कार सोहळ्यास उत्तर देत असताना म्हणाले की चिमूर क्रांती भूमीत शांतता ठेवण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगून जनता व प्रशासन यांच्यात प्रेम, विश्वास निर्माण करून माझी कामगिरी यशस्वी झाली असल्याचे सांगत सेवेचा प्रारंभ डहाणू ते गडचिरोली राज्याच्या शेवटच्या टोकापर्यत सेवा करीत चिमूर क्रांती भूमीत सेवानिवृत्त होत असल्याचे सौभाग्य सांगत त्यांनी आभार व्यक्त केले.
संचालन कैलास अलाम तर आभार विनोद जांभळे यांनी व्यक्त केले.
दरम्यान आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सत्कार मूर्ती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे यांचा शाल ,श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार केला, सेवानिवृत्त निरोप व सत्कार कार्यक्रमास पत्रकार संघ, रोटरी क्लब, शांतता समिती,पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.