Breaking News

जिल्हा कारागृहात आरोग्य तपासणी शिबिर

कारागृहातील 279 बंद्यांना मोफत समुपदेशन,आरोग्य तपासणी व औषधोपचार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तर्फे जिल्हा कारागृह येथील बंद्यांकरीता सर्वसमावेशक तपासणी व औषध वितरण आरोग्य शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.

या आरोग्य शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ, नाक, कान व घसा तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, दंत शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) नेत्र चिकित्सा अधिकारी, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ विभाग, एनसीडी विभाग व टाटा चमु, जिल्हा कार्यक्रम समन्वयक (एनसीडी), समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता व अधिपरिचारिका यांच्याद्वारे जिल्हा कारागृहातील 253 पुरुष, 25 महिला व एक बालक अशा एकूण 279 व्यक्तींना समुपदेशन, आरोग्य तपासणी व औषधोपचार करून आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे व कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित डांगेवार यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडसंगी येथे बहुजन विचार मंच व प्रेस मीडिया फाउंडेशन यांच्या वतीने

पत्रकार विकास खोब्रागडे यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन केले सन्मानित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-खडसंगी येथे …

सदर क्रमांक:-20 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved