
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील तुळाना येथील सेवकराम मिलमिले हे श्री क्षेत्र पंढरपूर येथे गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामगिता तत्वज्ञान प्रमुख तथा संचालक व संयोजक आहे. त्यावेळी वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते अमित निब्रड व त्यांचे कुटुंब दर्शनाला गेले असता. तुकाराम दादा गिताचार्य यांनी गुरुदेवसेवक च्या सहकार्यने व सेवकराम मिलमिले यांच्या सहकार्याने बांधलेले आश्रम पंढरपूर येथे अमित निब्रड यांच्या कुटुंबियांची राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था केली आहे. त्यामुळे सेवकराम मिलमिले यांच्या चंद्रपूर जिल्हातील गुरुदेव भक्तांना आव्हान केले आहे पंढरपूर आल्यानंतर या आश्रम ला भेट द्या व त्यावेळी सर्व मोफत सेवा देण्यात येईल.
त्यामुळे सेवकराम मिलमिले यांचं कार्य कौतुकास्पद आहे. त्यावेळी अमित निब्रड यांनी सेवकराम मिलमिले यांच विठ्ठलाची प्रतिमा देऊन स्वागत केले तसेच सेवकराम मिलमिले यांनी अमित निब्रड यांना सुद्धा ग्रामगिता देऊन स्वागत केले. त्यावेळी कुणाला पंढरपूर ला मोफत राहायच असेल तर अमित निब्रड यांच्याशी संपर्क करा अशी सूचना सेवकराम मिलमिले यांनी गुरुदेवभक्तांना केली.आपल कुटुंब असून सुद्धा कुटुंबांच्या आशीर्वादाने गुरुदेव सेवा मंडळ चा काम पंढरपूर सारख्या तीर्थ क्षेत्रात करत असल्याने वरोरा वासियांना अभिमानाची बाब आहे.