
नायब तहसीलदारांच्या आदेशाची केली अवहेलना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील सरडपार येथील घटना पन्नास फूट रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा माल शेतात पडलेला असुंन, एका शेतकऱ्यांनेच रस्ता अडविल्यामुळे व नायब तहसीलदार यांचे आदेशाची अवहेलना झाल्यामुळे पाच शेतकऱ्यांचा शेतात शेतमाल पडून आहे, तालुक्यातील सरडपार येथील रघुनाथ लक्ष्मण पाटील व अन्य पाच शेतकरी यांना नेहमी प्रमाणे जात असलेल्या रस्त्यावरून शेतातील पिके घेऊन जाण्याचा रस्ता सुरू होता पण चार वर्षापूर्वी कौसल्या बाला वरघणे यांनी शेत शिवारातील भूमापन क्रमांक १०२ ची जमीन खरेदी करून शेतात कुंपण केले,
या कुंपणामुळे अन्य शेतकऱ्यांना शेतातील निघालेले पिके नेण्यास मज्जाव केला, यामुळे रघुनाथ लक्ष्मण पाटील यांनी महसूल अधिकारी यांचेकडे रीतसर तक्रार केली त्यावर नायब तहसीलदार तुलसीदास कोवे यांनी स्वतः जाऊन मौका चौकशी करून वादग्रस्त जागेवरील तार कुंपण हटविले, व शेतकऱ्याना शेतमाल नेण्याकरिता रस्ता करून देण्यास सांगितले,
नायब तहसीलदार यांनी रस्ता मोकळा करण्याचे लेखी आदेश दिले असताना सुधा कौसल्या बाला वरघने यांचे मुलगी वंदना पिसे व नातू प्रकाश पिसे यांनी शेतकऱ्यांना शेतमाल नेण्यास मज्जाव केला, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांाच्या शेतातील शेत माल शेतात पडून आहे, महसूल अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली होऊन प्रशासन शांत बसले असून शेतात शेतमाल अडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, लवकरात लवकर महसूल विभागाने निर्णय घेऊन रस्ता अडवणूक करून आदेशाची अहवेलना करणाऱ्या शेतकऱ्यावर कार्यवाही करून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत शेतकरी रघुनाथ लक्ष्मण पाटील यांनी केली आहे.