
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी (प्र):-वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील दवलामेटी,गणेश नगर येथे एक पोलीस शिपाई कार दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
प्राप्त माहिती नुसार या अपघातात जखमी पोलीस शिपाई अंकुश नामदेवराव घटी वय-३७ वर्ष रा.सोनेगाव निपाणी असून ते अंबाझरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत.ते सोमवारी रात्री आपली टाटा टिगोर कार क्र.- एम.एच.३१,एफ.ई/१०६९ ने त्यांचे मामा रा.दवलामेटी यांच्या कडे जेवण करायला गेले होते व रात्री परत येत असतांना दौलामेटी परिसरात रस्त्यावर अचानक मोकाट जनावर आडवे आल्याने त्यांची कार अनियंत्रित झाले व त्यात कार जबर दुर्घटनाग्रस्त झाली.
या दुर्घटनेत कारचा पुढील भाग पूर्ण चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती व जोरदार आवाज होताच रस्त्यावरील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला तर हाताला फ्रॅक्चर आल्याने त्यांना तातडीने नागपूर स्थित वोक्हार्ट रुग्णालय येथे भरती करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रात्री अंधार व गाडी चा अधिक वेग व मोकाट जनावर या घटनेस कारणीभुत असल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शीत दिसून आली. पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.