
बहुजन विचार बहू.संस्थेचा उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/खडसंगी:-तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी,चिमूर प्रेस मीडिया फाउंडेशन व बहुजन विचार बहुउउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण छत्रपती शिवाजी महाजांच्या जयंती चे औचित्य साधून रक्तदान शिबिर आरोजीत करण्यात आले होते.या शिबिरात तब्बल ४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
या शिबिराची सुरुवात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात छ. शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला माल्यार्पण व द्वीपप्रज्वलन करून झाली.या शिबिराचे उदघाटक म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, अध्यक्ष डॉ.श्रीकांत रणदिवे, डॉ.कांचन धारने, रुग्णसेवक सुमित पटले उपस्थित होते.
किरण धानकुटे यांनी मार्गदर्शन करताना रक्तदान ही चळवळ निर्माण व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली.तर डॉ.श्रीकांत रणदिवे यांनी रक्तदानाची गरज,सामजिक महत्व व फायदे समजावून सांगितले.या वेळी संस्थेच्या उपक्रमाला रक्तदात्यांनी साथ देत विविध उपक्रमात विक्रमी ४५ झणांनी रक्तदान केलं.या कार्यक्रमाचे संचालन आशिष गजभिये, प्रास्तविक प्रतीक औतकर तर आभार प्रतीक चिंचाळकर यांनी मानले.यशस्वीतेसाठी सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.