
जनतेच्या समस्या पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी दिली
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर नगर परिषद अंतर्गत जनतेच्या भरपूर समस्यांचे निवारण पुर्ण होत नाही व चिमूर नगर परिषदला कोनी वाली नाही अस दिसुन येत असल्याचे काँग्रेसचे पप्पुभाई शेख यांनी सांगितले. येथील जनतेचे समस्या वेळेवर पुर्ण होत नसुन पुन्हा समस्यामधे वाढत होत चालली आहे.
चिमूर नगर परिषद चे मुख्याधिकारी यांच्याकडे किती तरी तक्रारी जमा होऊन आहे. परंतु मार्ग का निगत नाही, मुख्याधिकारी यांच्याकडे भिसी नगर पंचायत आणि चिमूर नगर परिषद या दोन गावाची जबाबदारी असल्यामुळे आठवड्यातून कधी भिसी तर कधी चिमूर परंतु कोणत्या दिवशी कुठे आहे हे बरोबर माहिती मिळत नसल्याने तालुक्यातील जनतेला नगर परिषद मधे चकरा माराव्या लागता, याकरिता प्रशासनाने मुख्यधिकरी यांचेकडे कोणतीही एका ठिकाणाची जबाबदारी द्यावी.
नगर परिषदेने निविदा काडून कांत्रकदार नाली उपसा करणे, आणि नगर परिषद अंतर्गत पुर्ण स्वछता करणे परंतु याकडे नगर परिषदेचे लक्ष नसल्यामुळे कांत्रकदार यांचे रोजीचे मजुर अर्ध काम करते अर्ध सोडते नगर परिषद अंतर्गत नाल्या पुर्ण पणे साफ होत नाही. स्वच्छता पुर्ण होत नाही फक्त नेहरू शाळे पासुन ते बस स्टॉप पर्यंत बाकी ठिकाणी नाही.फक्त कांत्रकदार यांचे इतकेच कामे असतील तर बाकी नगर परिषदेने करायला पाहिजे, पाण्याचे बोरवेल काही ठिकाणी बंद आहे. काही प्राभागत मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहे.
खाली नाली वरचा स्लाप अर्धा आहे बाकी खड्डा पडून आहे. कितीतरी वेळा सूचना देऊन याकडे नगर परिषदेचे कोणतेही लक्ष नाही. फक्त जनतेला त्रास देणे काही कामे घेऊन गेले की पहिले आपल्या घराचा ,पिण्याचा कर भरणा करा बाकी नंतर बघु असे कधी पर्यंत चालणार या करीता प्रशासनाने चिमूर नगर परिषदकडे लक्ष द्यावे अन्यथा नगर परिषद समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी दिले आहे.