
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील गदगाव येथील गावा जवळ असलेल्या जंगलात मोहिम राबवुन पोलीसांनी दोन ठिकाणी धाड टाकून कार्यवाही केली. या कार्यवाही दरम्यान आरोपी ताराचंद शंभरकर राहणार गदगाव यांच्या कडून 6 प्लॅस्टिक नग प्लास्टिक कॅन मध्ये दहा लिटर प्रमाणे 60 ली. मोहा दारू एकूण 18000/ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच चिमूर पोलीसांनी दुसऱ्या ठिकाणी कार्यवाही करीत पाच प्लास्टिक ड्रम 50 लि प्रमाणे 250 किलो मोहा सोडवा किंमत प्रति किलो 150 रू प्रमाणे एकूण 37500/रूपये, 5 प्लास्टिक ड्रम किंमत 2500/रूपये, 2 लोखंडी ड्रम किंमत 1000/ रुपये, 2 जर्मनी वाटे किंमत 1000/रुपये, दारू भट्टी साठी लागणारे इतर किरकोळ साहित्य नेवारपट्टी ,चाटू, लोखंडी पिपे असा एकूण 42000/ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.या कार्यवाहीतील आरोपी जितेंद्र शंभरकर राहणार गदगाव येथील आहे.
पोलीसांनी फरार आरोपी विरूद्ध म.दा.का. नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास निरीक्षक पोलीस मनोज गभने यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर पोलीस करीत आहे.