
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भिवापूर:-आज दिनांक 7 मार्च 2023 रोजी धुलीवंदना निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ गोडबोरी त. भिवापूर येथे सामुदायिक ध्यान प्रार्थना रामधून काढण्यात आली. धुलीवंदन म्हटले की, सर्व तरुण वर्गामध्ये उत्सव हा संचारला असतो, रंग, डीजे चा झिंगाट, व्यसन, आणि त्या व्यसनातून समाजात वाईट वृत्ती, प्रामुख्याने धुलीवंदना निमित्त संपूर्ण देशामध्ये चित्र पाहायला मिळते, पण याला अपवाद म्हणजे श्री गुरुदेव सेवा मंडळ गोंडबोरी येथे सलग 63 वर्षापासून वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेवर आधारित धुलीवंदना चा कार्यक्रम पार पडत असते. पहाटे उठून संपूर्ण गावांमध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आली. त्यानंतर संपूर्ण गाव स्वच्छ करून, गावातील घाण ही होळीच्या माध्यमातून गावाबाहेर जाळण्यात आली.
त्यानंतर गुरुदेव सेवक स्वच्छ कपडे परिधान करून, हनुमान मंदिर येथे एकत्रित येऊन सामुदायिक ध्यान प्रार्थने चा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सर्व गुरुदेव सेवक संपूर्ण गावांमध्ये भजनाच्या माध्यमातून, आणि श्री गुरुदेव च्या जयघोषात संपूर्ण गावांमध्ये रामधून काढण्यात आली. रामधूनीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. हनुमान मंदिर जवळ पोहोचतात तिथे महाराजांच्या आदेश्याप्रमाने चांगल्या विचारांची आधान-प्रधान करण्याकरिता सभेत रूपांतर झाले. आज या ठिकाणी ५० बाल गोपाल यांना जयाबाई माळवे यांच्या तर्फे रुमाल वाटप करण्यात आले. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामगीता प्रचारक मेघनाथजी साहरे साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी उमरेड पंचायत समिती प्रामुख्याने उपस्थित झाले. त्यांनी ग्रामगीतेवर आधारित होळीचे महत्व आणि त्यांची शासकीय सेवेची सुरुवात आणि सेवानिवृत्त प्रवास करत असताना ग्रामगीतेतून घेतलेला बोध या ठिकाणी व्यक्त केला.
महाराजांच्या उक्तीप्रमाणे ! हा देह तुला अर्पिला, हे नको सांगणे तुला, तुकड्या म्हणे चिंता चित्तातूनी वाहिली! असा प्रण उद्घोशित केले. माजी सरपंच प्रभाकरजी माळवे यांनी समारोपीय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव जी वैद्य, संचालन किशोरजी वाकडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल टाले, सागर माळवे, प्रकाश माडवे, किसनजी टाले,अरुणजी टाले, अमृत माडवे, घनश्याम माडवे, अमोल सोनटक्के, नितेश मेश्राम, अरविंद चिकराम, गौरव टाले, नामदेव शेंडे, रुपेश मेश्राम, महिला सकवारबाई माळवे, दुर्गा शेंडे,रंजना सोनटक्के, वैशाली धपकस, रविता ठाकरे, इंदिराबाई वाकडे, मालाबाई टाले, अंकिता गुळधे, पुष्पा जांभुळे,
*केली होती होळीने जाणा । परि दुःख न प्रल्हादप्राणा । हरिभक्त म्हणोनि । शेवटी छळणारेचि जळले हे गावासि कौतुक झाले । म्हणोनि जन ओरडले उपहास त्यांचा करोनि ॥ त्याच दिवशी शंकराने । काम जाळिला तिसऱ्या नयने । म्हणोनि कामास धिक्कारिले भूतसेनेने हलकल्लोळ करोनि ।। त्याच दिवशी सज्जनांनी वार्षिक यज्ञाची केली आखणी । संपूर्ण गाव साफ करोनि । द्यावे पेटवोनि कैचण ते* ।।
– वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज