Breaking News

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार समारंभ कार्यक्रम

सत्कारमूर्ती म्हणून आमदार सुधाकर अडबाले उपस्थित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चिमूर तालुका, मुख्याध्यापक संघ चिमूर तालुका, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना चिमूर तालुका, यंग टीचर्स असो. गोंडवाना युनिव्हर्सिटी, विजुक्टा चिमूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन, नेरी येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमास सत्कारमूर्ती म्हणून आमदार सुधाकर अडबाले उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरीचे अध्यक्ष विष्णूकांत बिरेवार, सत्कारमूर्ती पंकज घाटे, सचिव सुनील नागदेवते, अमीर धम्मानी, रामभाऊ भांडारकर, श्रीहरी शेंडे, मारोतराव अतकरे, टिकाराम पिसे, मुख्याध्यापक विनोद पिसे, मान. नरेंद्र विखार, जाणे सर, माधवराव पिसे, केवळराम वाघे, प्राचार्य तथा मुख्याध्यापक सुरेश येरणे, पिठाडे आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी विविध शाळा, जुनी पेन्शन संघटना व आयोजकांतर्फे आमदार सुधाकर अडबाले यांचा तसेच पंकज घाटे यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यात अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांची बिकट अवस्था आहे. राज्यात शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत आणि आपण मला आपल्या समस्या सोडवण्यासाठी सभागृहात पाठविले आहे. निश्चितच त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी आश्र्वस्त केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved