Breaking News

दिवसाढवळ्या काळया सोन्याची अवैधरित्या होतोय तस्करी

चिमूर-उमरेड राष्ट्रीय महामार्गावर उमरी फाट्या जवळ अवैधरित्या ट्रक ची सील तोडून दगडी कोळशाची तस्करी सुरू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील उमरी फाट्या जवळ मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा साठवणूक करण्यात आला असून दिवसा व रात्रीच्या वेळी अनेक ट्रकच्या माध्यमातून कोळशाची अफरातफर केली जात असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. उमरेड चिमूर राष्ट्रीय महामार्गावर असलेला उमरी फाटा रोड वर गेल्या मागील आठवडा भरापासून काळ सोन समजल्या जाणाऱ्या दगडी कोळस्याची साठवणूक अवैद्यरित्या केली जात आहे. मागील काही दिवसांपासून या ठिकाणी दिवसा व रात्री अवैधरित्या कोळसा उतरविण्यात येत असुन पहाटे दुसऱ्या ट्रक या वाहनाच्या माध्यमातून दगडी कोळसा लंपास केला जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे.पोलीस प्रशासन यावर कारवाई करण्यात असमर्थ ठरत आहे.त्याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही आहे.

यामागे पाठबळ कुणाचे?असा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे.रात्रीच्या अंधारात या ठिकाणी भरलेल्या ट्रक मधून कोळसा उतरविण्यात येत असून उर्वरित कोळशावर पाणी मारुन वजन वाढविले जात आहे. साठवणूक केलेला कोळसा दुसऱ्या ट्रक मध्ये टाकून लंपास सुद्धा केल्या जात आहे. हा दगडी कोळसा नांद गावातील गोकुल खदानीचा असल्याची दाट चर्चा मोठ्या प्रमाणावर नागरिकांत आहे. उमरी फाट्या जवळ उच्च प्रतीचा कोळसा मोठ्या प्रमाणात आहे. कमी दरात किलोच्या भावाने ट्रक वाल्याकडून घेऊन साठवणुक करून जास्त दराने विक्री सुरू आहे.

याकडे संबंधित विभागाने काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून या आधी वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्गावर खडसंगी व वाहानगाव च्या मधोमध असलेल्या ठिकाणी कोळशाचा साठा जमा होत होता काही वृत्तपत्रा मध्ये याबाबत बातम्या प्रकाशित करण्यात आल्या त्या ठिकाणी पोलीसांनी धाडसत्र राबवून कारवाई न करता चिमूर जवळ स्टॉल लावण्यास सांगितले अशी माफियांच्या माध्यमातून दबक्या आवाजात माहिती प्राप्त झाली आहे.सर्व अधिकारी यांची बांधनुक आम्ही केली आहे असेही माफिया सर्वांना सांगत फिरत असतात असे असतांना सुद्धा महसूल विभाग चिमूर , तहसीलदार , उपविभागीय अधिकारी , जिल्हाधिकारी यांनी याकडे जातीने लक्ष देऊन असल्या कोळसा माफियांवर गुन्हेगारी प्रवृत्तीची कारवाई करून साठ – गाठ असणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved