
पांढरवाणीच्या शेतकऱ्याची लेक झाली उद्योग निरीक्षक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनुसूचित जाती प्रवर्गातून शालू घरत राज्यात प्रथम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-जिद्द. सातत्यपूर्ण अभ्यास. कठोर परिश्रमासोबत योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळाल्यास यश नीच्छित मिळवता येथे. हे चिमूर तालुक्यातील पांढरवाणी या लहानशा गावातील अत्यलप भूधारक शेतकरी शेतमजूर असलेल्या शामराव घरत यांची मुलगी शालू घरत यांनी सिद्ध केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त गट क परीक्षेमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात तिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे शेतकऱ्याची लेक शालू घरत आता कर निरीक्षक होणार आहे. शालू घरत हिने घरातील अठरा विश्व दारिद्य्रवर मात करीत यश संपादन केल्यामुळे आज नेरी गावात मिरवणुक काढून तिचे स्वागत करण्यात आले.
चिमूर रोड वरील शिव मंदिरातून मिरवनुक काढत मुख्य मार्गाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात नेण्यात आले, सभागृहात गुरुदेव सेवा मंडळ नेरी तर्फे शालू सोबत तिच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला. शालूचे स्वगाव पांढरवानित अक्ष्वंत करून गावातील महिला पुरुषांनी रॅली काढत स्वागत केले. यावेळी गावातील नागरिकांच्या वतीने शालूचा सत्कार सर्व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला.या वेळी शालू ने मार्गद्शन करताना आपल्या यशाचे श्रेय आई. वडील. कुटुंबीय, शिक्षक. नेचर फाउंडेशन. मजीक परिवाराला दिले. तिच्या या यशाबद्दल शालूचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिद्द. सातत्यपूर्ण अभ्यास. कठोर मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच यश प्राप्त करता येते असे वक्तव्य या वेळी शालूने व्यक्त केले.