
वडकी पोलिसांच्या सतर्कतेने जबरी चोरीचा डाव पडला
अखेर लुटमार करणारी टोळी जेरबंद
प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्याही प्रकारची चोरी किंवा जबरी चोरी होऊ नये व नागरिकांच्या जीवाची व मालाची हानी होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन वडकी यांनी वडकी पांढरकवडा घाट देवधरी परिसरात सतर्क पेट्रोलिंग ठेवलेली आहे. अश्यातच दि 08/05/23 चे रात्री अंदाजे 12.00 वा दरम्यान निदर्शनास आले की, चार इसम हे रोड वर ये जा करणाऱ्या ट्रक व वाहनांना दगड मारून तसेच हातातील लाठीचा धाक धाकवून थांबवून जबरी चोरी करण्याच्या प्रयत्न करीत आहेत.
पोलीस घटनास्थळी पोहचताच चारही आरोपी घटनास्थळावरून त्यांचे वाहनाने पळून गेले. घटनास्थळवर दगड जमा केलेले व पडलेले होते. आरोपी हे ट्रक चे लाईट चे प्रकाशात दिसल्याने त्यांना पोलिसांनी ओळखले असून नावे निष्पन्न करण्यात आली. त्यांची नावे 1. कुनाल भास्कर केराम रा वडकी, 2. समीर अरुण येरेकर रा वडकी, 3. युवराज वसंत चटकी रा दहेगाव, 4. शंकर उर्फ शेषकुमार गजानन झिले रा. येरला अशी असून त्यांचेवर भादवी कलम 393, 341, 279, 34 प्रमाणे गुन्हा नोंद केला. त्यानंतर तात्काळ आरोपीचा शोध घेतला दोन आरोपींना ताब्यात घेतले असून चारचाकी वाहन ertiga क्र MH 31 EA 4626 किंमत 8,00,000 रुपये जप्त केले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास सपोनि विजय महाले करीत आहोत.
सदरची कार्यवाही मा पवन बन्सोड साहेब, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, मा पियुष जगताप साहेब, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, मा प्रदीप पाटील साहेब, मा संजय पूजलवार साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो स्टे वडकी विजय महाले, पो हवा अडपावार, नापोका रमेश मेश्राम, विजय बसेशंकर, पोका विकेश ध्यावर्तीवार, आकाश कुदुसे, किरण दासारवार, अरविन्द चव्हाण यांनी पार पाडली.