
तहानलेल्या पक्ष्यांना मिळणार पिण्यासाठी पाणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
शंकरपूर:-शंकरपूर उन्हाळ्याच्या दिवसात पक्षांना पाणी मिळत नसल्यामुळे हजारो पक्षी मृत्युमुखी पडते त्या पक्षांना वाचवण्यासाठी शंकरपूर येथील तरुण पर्यावरण मंडळाच्या वतीने पक्षी घागर वितरित करण्यात आले तसेच मान्यवराच्या हस्ते मुख्य चौकात पक्षी घागर बांधण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम ही संकल्पना तरुण पर्यावरणवाडी मंडळाने अमलात आणली मागील 19 वर्षापासून पक्षी घागर घरोघरी वितरित करण्याचा काम यावेळी मंडळाच्या वतीने 200पक्षी घागर बनविण्यात आले आहे येथील सरपंच साईश वारजूकर विरेंद्र हिंगे सौरभ जयस्वाल जालीम मेश्राम अक्षय बावनकर आमोद गौरकर व इतर मान्यवरांच्या हस्ते झाडांना पक्षी घागर बांधून वितरित करण्यात आले आहे.