
पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-जागतिक पर्यावरण दीन व पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष कवडू लोहकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व गुणवंतांचा सत्कार समारंभ गुरुदेव ग्राम विकास मंडळ चिमूर येथे आयोजित केला होता. यावेळी शेक्षनिक. सामाजिक क्षेत्रातील सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला.पर्यावरण संवर्धन समितीचे वतीने गुरुदेव ग्राम विकास मंडळ चिमूर येथे पर्यावरण समितीचे अध्यक्ष कवडू लोहकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य मारोतराव अतकरे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी भूषण पुरस्कार प्राप्त मोरेश्वर झाडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मंचकावर मुख्याध्यापक अशोक वैद्य. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लोणारे. तरुण पर्यावरणवादी मंडळचे अध्यक्ष अमोद गौरकार. माजी जिल्हा परिषद सदस्य ममता डुकरे. माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर. माधुरी रेवतकर. प्रा.गजानन माळवे उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरानी उपस्थित श्रोत्यांना व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सरपंच सम्राट पुरस्कार प्राप्त सांईश वारजुकर. संशोधक प्राध्यापक पंकज घटे. नावीन्यपूर्ण उपक्रम करीता उपसरपंच वैभव ठाकरे. दिव्यवंदना फौंडेशनचे शुभम पसारकर. गोल्ड मेडल चॅम्पियन तेजल बोरंकर. सर्पमित्र मुन्ना शेख. क्षयक्षणिक क्षेत्रात प्राविण्य प्राप्त अपूर्वा बनसोड. प्रणाली बुजाडे. अंजली भीमटे. पत्रकार क्षेत्रात विकास खोब्रागडे. प्रमोद राऊत. फिरोज पठाण यांचे सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजू दांडेकर. प्रास्ताविक कवडू लोहकरे. आभार मुख्याध्यापक रामदास कामडी यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रभाकर लोथे. प्रभाकर पिसे. भारती हजारे. मीनाक्षी बंडे. ईश्वर डुकरे. जयदेव रेवतकर. माधवी अगडे. राजकुमार माथूरकर यांनी अथक परिश्रम घेतले.