
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक सरदार पटेल वॉर्ड वरोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी उपस्थिती दर्शविली तसेच प्रमुख मान्यवर सामाजिक कार्यकर्ते सुधाकरभाऊ कुंकूले, शरदभाऊ यादव शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमितभाऊ निब्रड, शिवसेना शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम, शिवदूत बंडुजी डाखरे, उपशहर प्रमुख मनिष दोहतरे,जेष्ठ शिवसैनिक अतुलभाऊ नांदे,उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अनिल कुंकूले युवासेना जिल्हा सनमव्यक तथा माजी नगरसेवक दिनेशभाऊ यादव व युवासेना जिल्हा प्रमुख मनिषभाऊ जेठानी यांनी केले.
त्यावेळी समस्त शिवभक्तांना अल्पोहार देण्यात आला. त्यावेळी शर्माजी, पियुष जगताप, किरण कामडी,अविनाश गायकवाड, किसन वर्मा, पवन , याकुब शेख, आयान पठाण, अस्मित यादव, अमन वरखडे, मोनू रेड्डी, अस्मित यादव या सर्व शिवभक्तांनी सहकार्य केले. त्यावेळी वरोरा शहरातील समस्त शिवभक्त, शिवसैनिक उपस्थित होते.