Breaking News

वरोरा येथील एक सही संतापाची अभिनव आंदोलन पार पडले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा :-महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे चिखल झालं आणि लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी हे आपला स्वाभिमान गहाण ठेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षात जातं आहे, त्याबद्दल जनसामान्य माणसात मोठा संताप व्यक्त होताना दिसत आहे, तो संताप राज्य पातळीवर जावा व सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून या हेतूनं व महाराष्ट्राच्या विकासाबद्दल लोकजागृती करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून “एक सही संतापाची.” हे अभिनव आंदोलन वरोरा येथे दिनांक 8 जुलै ला सकाळी 11.45 च्या सुमारास घेण्यात आले होते.

स्थानिक गांधी चौक वरोरा येथे घेतलेल्या या अभिनव आंदोलनात नागरिकांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, यावेळी उपस्थित नागरिकांकडून मनसेच्या तयार केलेल्या स्वाक्षरी मोहीमच्या एक सही संतापाची लिखित कागदावर सह्या घेण्यात आल्या. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी राज्यातील पक्षांतर करणाऱ्या व पक्षात बंडखोरी करणाऱ्या नेत्यांसह लोकप्रतिनिधी यांच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला. या प्रसंगी मनसे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के. प्रशांत बदकी, प्रतीक मुडे, सूरज मानकर यांच्यासह मनसे महिला तालुका अध्यक्षा रेवती इंगोले व शहरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved