Breaking News

चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी मिळावी

आमदार कपिल पाटील यांचा विधानपरिषदेत तारांकित प्रश्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट एक्स्तर वेतनश्रेणी मिळण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला.अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. शिक्षक भारतीने अनेकदा ही मागणी शासनाकडे केली आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड यांचे मार्गदर्शनात राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर,नागपूर विभागीय सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे यांनी या मागणीसंदर्भात वेळोवेळी शासनाला निवेदने दिली.

चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट एक्स्तर वेतनश्रेणी मिळण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला.कपिल पाटील यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की,या मागणी संदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत नागपूर विभागीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून सामान्य प्रशासन विभागाकडे अहवाल प्राप्त झाला असून हा अहवाल सामान्य प्रशासन विभागाच्या विचाराधीन आहे.सामान्य प्रशासन विभागाने आवश्यक तो निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या निर्णयानुसार आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी याबाबतीत योग्य ती कार्यवाही करण्याचे नियोजित असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आमदार कपिल पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.आमदार कपिल पाटील यांनी हा तारांकित प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केल्याने हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved