Breaking News

राळेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई त्वरीत देण्यात यावी

शिवसेनेचे तहसीलदार अमित भोईटे यांच्याकडे मागणीचे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सतत तिन दिवसाच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले, सर्व शेती पुर्णता खरडुन गेली हातात आलेले पिक वाहुन गेले. काही गरीब कुटुंबातील घरे अक्षरशः सतत पाऊस असल्याने वाहुन गेले.त्याचे कोणत्याही प्रकारचे पंचनामा अथवा चौकशी झाली नाही याबाबत आज रोजी .तहसीलदार अमित भोईटे यांना रितसर निवेदन देण्यासाठी राळेगाव तालुक्यातील व शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी यांनी त्वरीत पंचनामें करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात यावी या प्रमुख मागणी सह राळेगाव शहरात शिव भोजन थाळी दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे त्या मुळे गरिब वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे त्या बद्दल सुद्धा चर्चा करण्यात आली.

तहसीलदारांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिला आपले निवेदन शासनास पाठवुन आपणास योग्य न्याय मिळेल असे अभिवचन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला तहसीलदारानी दिले. उपस्थितीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख विनोद भाऊ काकडे, शहर प्रमुख राकेश भाऊ राऊळकर, शहर संघटक इमरान पठाण, व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख सुनिल क्षिरसागर, युवा सेनेचे योगेश मलोंडे,उप शहर प्रमुख महिंद्रा तुमाणे,उप शहर प्रमुख दिपक येवले सिमरण इमरान पठाण नगरसेविका तथा महिला बाल कल्याण सभापती,सौ.वर्षाताई मोघे(तालुका प्रमुख महिला आघाडी) विजय पाटील, सुनिल सावरकर, सुरेंद्र भटकर, अमोल राऊत,वृषभ दरोडे, गणेश जांभुळकर, अमोल देवतळे ,अखिल निखाडे, शंकर भाऊ गायधने ,अंकुश गेडाम, रोशन उताणे, नितिन नेवारे, महादेव पोंगडे, संदिप गेडाम, धनंजय चामलाटे, चेतन शिंदे, घनशयाम शिंदे, गजानन तिवसे, प्रकाश तिवसे, सह शिवसेनेचे तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved