Breaking News

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळवाटप कार्यक्रम साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :-इर्षावाडी येथे दरड कोसळल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे महाराष्ट्राचे शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे आज चिमूर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आनंद किन्नाके यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले असून रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना पक्ष व वाहनगाव सरपंच प्रशांत कोल्हे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, नितीन लोणारे, संजय वांकडे, तालुका संघटक रोशन जुमडे, युवासेना तालुका अधिकारी शार्दुल पचारे, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, बालू मेश्राम, समीर बल्की, समीर आडे, अजय मसराम आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved