Breaking News

पोलीस पाटील भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी – चिमूर तालुका शिवसेनेची मागणी

उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांना शिवसेनेचे निवेदन

अनागोंदी करणाऱ्यावर कार्यवाही करा अन्यथा ठिय्या आंदोलन करू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत नुकतीच पोलीस पाटील पद भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून मात्र या पदभरती प्रक्रियेत राजकीय दबावापोटी पक्षपाती झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहे. त्याप्रमाणे तोंडी परिक्षे प्रमाणे उमेदवारांना समान प्रश्न विचारण्यात आले.

त्याचे सदर उमेदवारांनी समान उत्तरे देवुनही गुण देतांना पक्षपातीपणा करण्यात आले. पोलीस पाटील पदावर नियुक्त केलेल्या उमेदवारांच्या यादीत भाजपा समर्पित व्यक्तींचाच भरणा असल्याचा शिवसेनेला ठाम विश्वास झाला आहे. तोंडी परिक्षे प्रमाणे व यादी बनवितांना भाजपा तालुका अध्यक्षांची उपस्थिती भरती प्रक्रियेत संशय निर्माण करीत असल्याचे अन्यायग्रस्त उमेदवारांचे आक्षेप असल्याने पदभरती प्रक्रियेत पक्षपातीपणा झाल्याचे वाटते. तरी उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर अंतर्गत भरलेल्या पोलीस पाटील पद भरतीची सखोल चौकशी करून अन्यायग्रस्तांना न्याय तथा अनागोंदी करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी.

येत्या ५ ऑगस्ट पर्यंत प्रकरणाची चौकशी न झाल्यास चिमूर तालुका शिवसेना अन्यायग्रस्त उमेदवारांसह उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर येथे ठिय्या आंदोलन करतील असा इशारा या वेळी देण्यात आला. यावेळी शिवसेना सरपंच प्रशांत कोल्हे. तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते. संजय वाकडे. नितीन लोणारे. युवा सेना तालुका अधिकारी शार्दुल पचारे. प्रसिध्दी प्रमुख सुनिल हिंगणकर, अजय मसराम, प्रवीण दांडेकर,अजय मोहनकर आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved