Breaking News

सोनामाता हायस्कूल चहांद येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

यवतमाळ/राळेगाव:-श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने सोनामाता हायस्कूल चहांद येथे दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी वर्ग 5 चे विद्यार्थी सोहम कोल्हे, वेदांत मांडवकर यांनी श्रीकृष्णाची तर श्रावणी महाजन, वैष्णवी मांडवकर यांनी राधेची अतिशय सुंदर अशी वेशभूषा केली होती. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेत वर्ग पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यावर अतिशय अप्रतिम असे नृत्य सादर केले सादर केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी श्रीकृष्णाच्या गाण्यांवर ताल धरला. या कार्यक्रमात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

यानंतर शाळेच्या पटांगणावर दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने पाना फुलांनी सजवलेली सुबक दहीहंडी उंचीवर टांगली. यानंतर विद्यार्थ्यांनी थरावर थर तयार करून दहीहंडी फोडली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतर्फे गोपाळ काला तयार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना केल्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने काल्याचा आस्वाद घेतला. अशाप्रकारे सोनामाता हायस्कूल चहांद येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved