Breaking News

साखरे ऐवजी गुळ का वापरावा

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव

शेवगांव:-उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन- B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे.

गुळ खाण्याचे हे आहेत फायदे:

👉🏽 *हिमोग्लोबिन वाढवते-* ऍनिमिया दूर करण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर असते. 100 ग्रॅम गुळामध्ये 11 mg लोहाचे प्रमाण असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास गूळ फार उपयुक्त असते.

👉🏽 *रक्तदाब नियंत्रित ठेवतो-* गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

👉🏽*पचनशक्ती सुधारते-* गुळामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच गूळ खाण्यामुळे नियमित पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

👉🏽 *स्त्रियांसाठी उपयुक्त-* सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी गुळ खाणे उपयुक्त असते. कारण मासिक पाळी, अयोग्य आहार यांमुळे स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी आढळते. यासाठी वयात येणाऱ्या मुली, मासिक पाळी असणाऱ्या स्त्रियांनी गुळाचा आहारात जरूर समावेश करावा. गरोदरपणातही लोहाचे खूप महत्त्व असते. यासाठी गरोदर स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरीनंतरही गूळ हितकारी असतो.

आयुर्वेदानुसार गुळाचे महत्व आणि गुळाचे फायदे :

आयुर्वेदात गुळाचे खूप महत्व आहे. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधेही गुळाबरोबर दिली जातात. आयुर्वेदातही गुळ खाण्याचे फायदे अनेक सांगितले आहेत. गुळ हे वातनाशक असून गुळ सुंठीबरोबर खाल्ल्यास वाताचे शमन होऊन मज्जावह संस्थेला म्हणजे नर्व्हस सिस्टीमला बल देते. जुना गुळ खाल्यास कफनाशनाचे कार्य होते. गुळामुळे दमा, खोकला यासारखे कफाचे विकार कमी होण्यास मदत होते. शरीरातील थकवा दूर करण्यासही गुळ उपयोगी ठरते.

साखर खाणे चांगले की गुळ खाणे चांगले .. ?

साखरेच्या तुलनेत गुळ पौष्टिक असतो. आयुर्वेदानेही साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ मानला आहे. साखरेत केवळ कॅलरीज असतात आणि याशिवाय कोणतेही उपयुक्त पोषकतत्वे साखरेत नसतात. त्यामुळे साखरेचे पदार्थ अति खाण्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढून वजन व चरबी वाढत असते. त्यामुळे हृदयविकार व डायबेटीसचा धोकाही वाढत असतो. तर गुळामध्ये लोह (आयर्न), मॅग्नेशियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन- B अशी अनेक आवश्यक पोषकतत्वे असतात. तसेच शरीरात गुळाचे शोषण धिम्यागतीने होते. त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढत नाही. त्यामुळे साखर आणि गुळाची तुलना करता, आरोग्यासाठी गुळचं खाणे हितकारक असते.

गुळ खाण्यामुळे होणारे नुकसान :

अधिक प्रमाणात गुळ खाण्यामुळे वजन वाढू शकते. वजन अधिक वाढण्यामुळे डायबेटीस, हृद्यविकार होण्याचा धोकाही वाढू शकतो.
– गूळ अधिक खाण्यामुळे पोटात जंत होण्याचा त्रास होऊ शकतो. आमवात किंवा rheumatoid arthritis चा त्रास असल्यास गुळ खाणे टाळावे. कारण यात sucrose चे प्रमाण अधिक असल्याने या त्रासात सांध्यातील सूज अधिक वाढू शकते.

*ताजा कलम*
गुळ अधिक खाण्यामुळे रक्तातील साखर (ब्लड शुगर) वाढू शकते. त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी गूळ अधिक खाणे टाळावे. मधुमेह असणाऱ्यानी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गुळाचा समावेश करावा.

अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ते..

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved