Breaking News

स्वराज्य उभं करणं कोण्या एकट्याचे काम नसतं

आपली माणसं वेळोवेळी आपल्याला हिम्मत देत असतात – दिव्या मॅडम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर/बारामती:- व्हॉईस ऑफ मीडियाचा पाया संदीप काळे सरांनी पक्का केला म्हणून आपण त्यावर एक भिंत उभी करू शकतोय. व्हॉईस ऑफ मीडिया आज नंबर वन होण्यामागे, हे सर्व एवढं वाढण्यामागे आपले सर्वांचे श्रेय आहे. माझी फक्त पोस्टमास्तरची भूमिका आहे. हे सर्व तुमचं आहे. तुमच्यामुळे आहे. गेल्या दोन दिवसाच्या अधिवेशनात आपण सर्वांची उपस्थिती पाहून मन भारावून गेले.

अधिवेशनाला येण्यासाठी आपली सर्वांची धावपळ, प्रवास येतानाचा त्रास या सर्व गोष्टी बाजूला सारून तुमच्या सर्वांन मधील उत्साह मात्र कमालीचाच. आपला हा एक परिवार आहे. आणि सांगायला आनंद होतो कि यावर्षी बारामती मध्ये आपल्या व्हॉईस ऑफ मीडिया परिवाराची दिवाळी अतिशय उत्साहात संपन्न झाली.

आपल्या सर्वांना भेटून मला पुढील कामासाठी खूप ऊर्जा मिळाली. या दोन दिवसाच्या अधिवेशनातून आपण जी विचारांची शिदोरी, जो चांगुलपणाचा प्रसाद घेऊन गेले आहात तो प्रसाद आपला आता आपल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवायचा आहे. मला खात्री आहे ज्या उत्साहाने आपण अधिवेशनात सहभागी झालात तोच तुमचा जोश, तो तुमचा उत्साह कायम राहील कायम राहील.त्यातून नक्कीच काहीतरी नवनिर्माण होईल.आपल्या सर्वांनाचे मनापासून आभार, सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐🙏*आपली दिव्या*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved