Breaking News

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी विशेष शिबिर

25 व 26 नोव्हेंबर रोजी सर्व मतदान केंद्रावर आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 21- : 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर 71-चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नागरिकांची नावे नोंदविणे, मतदार यादीतील मय्यत मतदारांचे नाव कमी करणे तसेच मतदार यादीत नावाच्या चुका, पत्ता व आधार जोडणीबाबत विशेष मतदार शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

या शिबिराचे आयोजन दि.25 व 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर करण्यात आले आहे. तरी, सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved