Breaking News

तुमसरात सत्यशोधक विवाह ठरला “प्रेरणादायी विवाह “

वर – वधू बुद्धिष्ट,विवाह मात्र सत्यशोधक पद्धतीने

(विवेक बोरकर आणि अधिक्षा सिंगाडे यांनी रचला नवा पायंडा)

जिल्हा प्रतिनिधी-जयेंद्र चव्हाण

भंडारा:-विवेक बोरकर आणि अधिक्षा सिंगाडे या नवदाम्पत्याने “सत्यशोधक विवाह” पद्धतीने विवेकी सहजीवनाची सुरवात तुमसर येथिल शकुंतला सभागृहात केली.

वर आणि वधू दोन्हीं बुधिध्ट असताना सुद्धा परंपरेला छेद देत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीचा अंगीकार केला.तेव्हा हा विषय इतरांसाठी प्रेरणादायी ठरला.शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर चे मुख्याध्यापक तथा प्रबोधनकार राहुल डोंगरे यांनी “झाले शुभमंगल झाले,आज हे शुभमंगल झाले” हया सत्यशोधक मंगल अक्षता सादर करून हा सत्यशोधक विवाह पार पाडला.

सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध,राष्ट्रमाता जिजाऊ,जगतगुरु तुकोबाराय,रयतेचे राजे शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतिज्योती सावित्रीआई फुले,राजर्षी शाहू महाराज,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर,भारतीयांची आई ‘ रमाई ‘ या महामानवांना वर – वधू आणि दोन्हीं कुटुंबियांच्या पालकांनी अभिवादन केले. सत्यशोधक विवाह संपन्न झाल्यानंतर उभयत्यांना प्रबोधनकार राहुल डोंगरे यांनी शपथ दिली.जोडीने समाजाचे,देशाचे, माता पित्याचे ऋण फेडू अशी शपथ घेतली, हे विशेष!

भारतीय समाजात विवाह किंवा लग्न ही जीवनातील महत्वाची घटना समजली जाते.याच भावनेला धार्मिक आशय देवून त्यावर तसे कर्मकांड,रीती रिवाज, जातीव्यवस्थेचे, धर्मव्यवस्थेचे व एकूणच संस्कृतीची परिघे चढविली जातात.याला क्रांतीसुर्य महात्मा फुल्यांनी छेद दिला.महात्मा फुले यांनी स्त्रिशुद्रातिशुद्रांच्या या धार्मिक प्रथेचा सखोल अभ्यास केला.पुरोहितांनी थोतांड कर्मकांड सांगून स्वतःची पोट नेहमीच भरली आहेत व त्यांची सत्ता वर्चस्व बहुजनांच्या मनात ठसविले,ही पार्श्वभूमीवर भारतीय विवाह संस्थेच्या मुळाशी आहे.पैश्याची बचत,स्त्री – पुरुष समनाता,सत्य,प्रेम,नम्रता, धर्मनिरपेक्षता,अंहिसा,आत्मनिर्भरता, एकनिष्ठा, समता ही सहजीवनाची मूल्ये या सत्यशोधक विवाहातून रुजविण्यात येतात असे प्रतिपादन समाजप्रबोधक राहुल डोंगरे यांनी केले.यास्तव हा विवाह सोहळा प्रेरणादायी व चर्चेचा विषय ठरला आहे.

याप्रसंगी “समतेच्या वाटेने” या गीताने वरवधुचे सोबतच विवाह मंचावर आगमन झाले.प्रकाश चव्हाण यांनी डफ वाजवून आणि आकाश मेश्राम,यश सोमकुवर,पंकज सोमकुवर,आशिष वासनिक,रितेश सरजारे यांनी”समतेच्या वाटेने “हे गीत सादर करून उपस्थित पाहुण्याची मने जिंकली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved