Breaking News

शेवगांव शहरातील नुकताच गुन्हा झालेला तो डॉक्टर फरार हॉस्पिटलच्या नावाखाली पूर्वी हा करायचा अनेक उद्योग???

शहरातील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये पूर्वी हा गर्भलिंगनिदान चाचणी करायचा तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ठोकले होते सी,???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसांपूर्वी शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला तो संशयित आरोपी डॉक्टर फरार शेजारच्या *पैठण तालुक्यातून मेडिकल व्यवसाय करण्यासाठी शेवगाव शहरामध्ये आला व एका शहरातील प्रसिद्ध दवाखान्यामध्ये आपलं मेडिकल ही सुरू केलं त्याचबरोबर आपल्याकडे असलेल्या बनावट डॉक्टर डिग्रीच्या जोरावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली “गर्भलिंग निदान चाचणी” तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कायदेशीर बंदी घातलेली आहे संबंधित डॉक्टर हजारो रुपये फीस घेऊन गर्भलिंग निदान {मुलगा आहे का मुलगी आहे } चाचणी करत होता आणि अनेक गर्भपात करत होता तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी गुप्त खबऱ्या मार्फत माहिती काढूनसंबंधित सोनोग्राफी सेंटर आणि हॉस्पिटल सील केले होते, व मशिनरी जप्त केली होती.

सध्याआता मुलाकडे असलेले ओ.पी.डी. { बाह्य रुग्ण तपासणी केंद्र } चे डिग्रीवर आय.पी.डी. { रुग्ण ऍडमिट करून त्यावर उपचार करणे } असा उद्योग सुरू होता *अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक तालुका वैद्यकीय अधिकारी जिल्हा वैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आरोग्य विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोईस्कर रित्या डोळे झाक केल्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे “व्हाईट कॉलर गुन्हेगारांची” शोकावते ज्याला लिंबाच्या झाडाखाली सलाईन लावायचा अनुभव नाही तो गंभीर रुग्ण ऍडमिट करून त्यावर मनमालेल उपचार करतो व रुग्णांच्या जीवाशी खेळतो शेवगाव शहरातील व तालुक्यातील अनेक रुग्णालयांना फक्त ओ.पी.डी. चालवण्याचा परवाना असून पैशाच्या जीवावर मोठमोठ्या इमारती बांधून रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार अशा लोकांना कोण देतं???* याची शेवगाव शहरात आणि तालुक्यात गेल्या काही दिवसापासून चर्चा असून *{उपचारारूपी } “भीक नको { लुट रुपी } कुत्रा आवर” असे म्हणण्याची वेळ तालुक्यातील रुग्णांवर आली आहे*

*ताजा कलम*

*शेवगाव शहरातली तालुक्यातील अनेक हॉस्पिटल व क्लिनिक बॉम्बे नर्सिंग ऍक्ट 1960 अग्निशमन प्रतिबंधक कायदा नगरपरिषदेचा विहित नमुन्यातील परवाना त्याची नोंदणी व नूतनीकरण न करता राजरोस सुरू आहेत या गुन्ह्याचे निमित्ताने आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वच रुग्णालयांच्या परवानग्या तपासणे योग्य राहील म्हणजे भविष्यात कोणी असे धाडस करणार नाही*

क्रमशः

*शेवगाव शहरांमध्ये आणि तालुक्यात परवाना ओपीडीचा आणि चालवतात आई पिढी परवाना आयुर्वेदाचा आणि प्रॅक्टिस ऍलोपॅथीची राजरोस सुरू आहे जबाबदार कोण???*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved