Breaking News

शिवजन्मोत्सव संभाजी ब्रिगेड तर्फे मोठ्या थाटात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

बल्लारपुर:-संभाजी ब्रिगेड बल्लारपुर शहरात शिवजन्मोत्सव सोहळा गेल्या दोन दशकांपासून साजरा करीत आहे. यंदाही शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. १९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद आणि संभाजी ब्रिगेड च्या सर्व कार्यकर्त्यांनी नगर पालिकास्थित शिवस्मारकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.या प्रसंगी धम्मपाल मुन यांच्या नेतृत्वात सह्याद्री ढोल ताशा पथकातर्फे ढोल ताशाचे सुरेख वादन करण्यात आले.आणि संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती तर्फे शोभायात्रा काढण्यात आली.

दिनांक २० फेब्रुवारी रोजी झाशी राणी चौकात पवनपाल महाराजांचे प्रबोधनपर किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन लाभलेले शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी शिवरायांचा सर्वसमावेशक मानवतावादी दृष्टिकोन आज अंगिकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रा. दिलिप चौधरी यांनी शिवरायांच्या शेतीविषयक आणि रोजगाराभिमुख केलेल्या भरीव कार्याची माहिती सांगताना आज अशा लोकाभिमुख धोरण राबविल्याशिवाय देशाचा उद्धार शक्य नसल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे यांनी शिवरायांनी केलेले लोकाभिमुख कार्य आणि समतेने, ममतेने चालविलेल्या राज्यामुळे आज ३५० वर्षांनंतर आजही ते जनतेच्या हृदयात विराजमान असल्याचे मांडले. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे दिवंगत कार्यकर्ते चंद्रशेखर भेंडारकर यांचा मरणोपरांत सन्मान करीत कुणाल क्षीरसागर यांनी त्यांच्या गौरवार्थ स्मृतीपुष्प वाचन केले.यानंतर झालेल्या किर्तनात शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेली जनता पवनपाल महाराजांच्या किर्तनाने मंत्रमुग्ध झाली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणय वाटेकर, सूत्रसंचालन रोहित चुटे आभार प्रदर्शन पवन राजगडे यांनी केले. जनतेने शिवजन्मोत्सव सोहळ्याला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल अध्यक्ष साहिल घिवे, सचिव प्रतिक वाटेकर आणि वार्ड शाखा अध्यक्ष सुभाष पोटे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा शिवजन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी संकेत चौधरी यांच्या नेतृत्वात गणेश मसराम, निखिल वडस्कर, निलेश सुर, चेतन मुळे, हर्ष नागरकर,प्रणय कष्टी,प्रज्वल गौरकार, द्यानेश्वर गहुकर, अनिकेत गजभिये,दीप आत्राम,दिवांशू पोटे,अमोल आडे, प्रनील नवघरे,ओम जमदाळे, संकुल झाडे, मयूर पोडे, अक्षय पप्पुलवार, शिवा कोतपल्लीवार आणि इतर सर्व संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी अथक परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved