Breaking News

आज चिमूर येथे आदिवासी लाभार्थी मेळावा – मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांची उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-आदिवासी एकात्मीक विकास प्रकल्प चिमूर च्या वतीने आदिवासी लाभार्थी मेळावा शुक्रवार ला राज्याचे मंत्री आदिवासी विकास विभाग डॉ. विजयकुमार गावीत यांचे अध्यक्षतेखाली शहीद बालाजी रायपुरकर सभागृह, संविधान चौक वडाळा ( पैकु) येथे आयोजीत केलेला आहे.मेळाव्याचे उद्घाटक चंद़पुर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय सुधिर मुनगंट्टीवार, राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वड्डेटिवार, खासदार अशोक नेते, विधान परिषद चे आमदार रामदास आबंटकर, विधान परिषद चे आमदार अभिजीत वंजारी, विधान परिषद शिक्षक मतदार संघ चे आमदार सुधाकर अडबाले,आमदार किर्तिकुमार भांगडिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख उपस्थिती भारतीय प्रशासकीय सेवा, सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई विजय वाघमारे, भारतीय प्रशासकीय सेवा आदिवासी विकास विभाग नाशिक नयना गुंडे, अप्पर आयुक्त आदिवासी विकास भारतीय प्रशासकीय सेवा रविंद्र ठाकरे, चंद़पुर जिल्हाधिकारी विनय गौंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, पोलीस अधिक्षक ममक्का सुदर्शन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिसरातील आदिवासी बांधवानी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चिमूर चे प्रविण लाटकर यांनी केलेले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved