Breaking News

शुभम मानव सेवा पुरस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-मुंबई येथील मराठा लाईफ फाउंडेशन व जीवन ज्योत ड्रग बँक, नशा मुक्ती केंद्र सिंधुताई सपकाळ व वच्‍छलाबाई लोखंडे यांच्या स्मृतीप्रितर्थ 2024 चा मानवसेवा पुरस्कार दिव्य वंदना आधार फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम पसारकर यांना मराठा लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष किसन लोखंडे यांच्या हस्ते देण्यात आला.चिमूर क्रांती भूमीतील मनोरुग्णाचा आधारवड शुभम या युवकाने कोणतेही शासकीय अनुदान नसताना स्वतः चंद्रपूर, गडचिरोली ,भंडारा ,गोंदिया या जिल्ह्यामध्ये मोहीम राबवून रोडवरील बेघर, बेवारस ,अनाथ, निराधार ,मनोरुग्ण लोकांना निस्वार्थपणे सेवा देत आहे.

दरम्यान कोरोना काळात ज्यांच कोणी नाही अशा लोकांना आश्रय देत काहींचा उपचार केला. उपचारातून बरे झाले त्यांना घरी पोहोचण्याचा काम केलं गेल्या पाच वर्षापासून गरजू लोकांची सेवा करीत आहे. याची दखल घेत चिमूर क्रांती भूमीतील मनोरुगनाचा आधारवड दिव्यवंदना आधार फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम पसारकर यांना मानवसेवा पुरस्कारसह एक लाख पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. चिमूर तालूक्यातील जामगाव कोमटी येथे चंद्रपूर, गडचिरोली ,भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यातील रोडवरील बेघर,बेवारस, अनाथ, निराधार ,मनोरुग्ण लोकांनकरिता पहिले केंद्र बनत आहे. या आधार फाउंडेशनचे हात बळकट करा असे आवाहनही शुभम पसारकर यांनी यावेळी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved