नागपूर दि. 13 : जिल्ह्यात आज 1769 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 2343 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (52471) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 39139 झाली आहे.
एकूण क्रियाशील रुग्ण 11664 असूनपैकी 5884 गृह विलगिकरणात आहेत. आज 45 मृत्यु झाले असून त्यापैकी 5 मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.61टक्के आहे.