
तब्बल 40 दमकल वाहन घटनास्थळी दाखल
नागपुर : नागपुर च्या लकडगंज परीसरात आज सकाळी 6 वाजता भिषण आग लागल्याची घटना घडली, या आगीत 6 दुकाना सह 60 लाखाच्यावर नुकसान झाले असल्याची माहीती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नागपुरच्या लकडगंज पोलीस स्टेशन च्या समोर असलेल्या टिम्बर मार्ट ला आज सकाळी 6 वाजता च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली, आगीवर नियंत्रण करण्याकरीता जवळपास 40 दमकल वाहन घटनास्थळी दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण करण्याकरीता परीश्रम घेतले. आगीत 60 लाखांचा वर माल जडून खाक झाल्याची माहिती टिम्बर मार्ट चे मालक नितीन हरिभाई पटेल यांनी दिली !
आग कशामुळे लागली हे अजुनही स्पष्ट झालं नाही, लकडगंज पोलीस तपास करीत आहे !