
- आतापर्यंत १३७७९ व्यक्तिं विरुध्द कारवाई
नागपूर, ता.२१ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (२१ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २८८ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १३७७९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ५२,४८,५००/- चा दंड वसूल केला आहे.
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ७६, धरमपेठ झोन अंतर्गत ६१, हनुमाननगर झोन अंतर्गत ३९, धंतोली झोन अंतर्गत १२, नेहरुनगर झोन अंतर्गत ११, गांधीबाग झोन अंतर्गत १६, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १५, लकडगंज झोन अंतर्गत ८, आशीनगर झोन अंतर्गत १६, मंगळवारी झोन अंतर्गत २८ आणि मनपा मुख्यालयात ६ जणांविरुध्द बुधवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ८३०९ बेजबाबदार नागरिकांकडून रु ४१ लक्ष ५४ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.
नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून वचक करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नगारिकांना बचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे.
तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.
आतापर्यंत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २१०७, धरमपेठ झोन अंतर्गत २६९४, हनुमाननगर झोन अंतर्गत १३४२, धंतोली झोन अंतर्गत ११७६, नेहरुनगर झोन अंतर्गत ७५५, गांधीबाग झोन अंतर्गत ९०३, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ९२०, लकडगंज झोन अंतर्गत ७८८, आशीनगर झोन अंतर्गत १४२७, मंगळवारी झोन अंतर्गत १५३६ आणि मनपा मुख्यालयात १३१ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली.