Breaking News

मनपामध्ये आणखी ११३८ ऐवजदार सफाई कर्मचारी होणार स्थायी

नागपूर, ता. २६ : शहराच्या स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सफाई कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. त्यांच्या सेवाकार्याचा सन्मान व्हावा, ऐवजदार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनपामध्ये स्थायी नियुक्ती मिळावी यासाठी अनेक वर्ष केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. यापूर्वी २ मार्च २०२० रोजी मनपाच्या स्थापना दिनी तब्बल २२०६ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. त्याचा दुसरा टप्पा म्हणून आता ११३८ ऐवजदार सफाई कर्मचारी बांधव आणि भगीनींना स्थायी नियुक्ती आदेश देणे सुरू आहे.

नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत ११३८ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी केले जाणार आहे. सोमवारी (ता.२६) महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात दहा झोनमधील ११ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर संदीप जोशी होते. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी गजेंद्र महल्ले, राजेश हाथीबेड, किशोर मोटघरे, राजेश लवारे यांच्यासह दहाही झोनचे विभागीय अधिकारी तसेच स्वास्थ निरीक्षक उपस्थित होते.

प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी प्रतिकात्मक स्वरूपात लक्ष्मीनगर झोनच्या कुसुम मोटघरे, धरमपेठ झोनच्या रेखा चव्हाण, हनुमाननगर झोनचे शरद गजभिये, धंतोली झोनच्या माधुरी मनपिया, नेहरूनगर झोनचे चंद्रदर्शन रंगारी, गांधीबाग झोनचे विशाल तुर्केल, सतरंजीपुरा झोनचे भक्तपाल नंदेश्वर, लकडगंज झोनचे पृथ्वीराम मेश्राम, आसीनगर झोनचे रुक्मिनी माटे, मंगळवारी झोनच्या नंदा देशपांडे आणि शुद्धोधन घुटके या ११ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved