
नागपूर, दि.26 : आधार नोंदणीसाठी आता ऑनलाईन अपॉईन्टमेंट घेण्याची सुविधा https://ask.uidai.gov.in/#/ या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी पोर्टलवर जाऊन मोबाईल क्रमांक अथवा ईमेल आयडी टाकून अपॅाईन्टमेंट घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.
अपॉईन्टमेंटमध्ये नमूद केलेल्या आधार नोंदणी केंद्रावर दिलेल्या वेळेस बारकोड असलेली अपॉईन्टमेंटची प्रत द्यावी. ज्यामुळे आधार नोंदणी केंद्रचालक ती स्कॅन करुन माहिती पोर्टलवरुन प्राप्त करुन घेतो. पोर्टलवर अपॉईन्टमेंट नोंदणी करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. अपॉईन्टमेंटची नोंदणी करणे निशुल्क आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
जिल्हयात सध्या एकूण शंभराहून अधिक आधार नोंदणी संच असून या संचाची माहिती https://appointments.uidai.gov.in/ या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच आधार रिप्रिंट करणे, आधारवरील पत्ता अपडेट करणे, आधारची स्थिती इत्यादी माहिती https://uidai.gov.in/ या पोर्टलवर भेट द्यावी. तसेच आधार टोल फ्री क्रमांक 1947 वर संपर्क साधावा. नेट कॅफे यांनी नागरिकांना सदर सुविधा उपलब्ध करुन दिल्यास योग्य त्याच शुल्काचीच आकारणी करावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.