नागपुर : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका येथे असलेल्या बोलोना गावातील एका १२ वर्षिय आदिवासी बालिकेवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. एकीकडे दलित आदिवासी मुली व महिलांवर दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून त्याकडे गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या सरकार चे दुर्लक्ष असुन त्यांचे फक्त सिने अभीनेता – अभिनेत्री कडे जास्त लक्ष असल्याचा आरोप आँल इंडिया पैंथर सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केला आहे.
मोलमजुरी करून राहणारे हे आदिवासी कुटुंब मुळचं मध्यप्रदेश येथील पांढुरना गावातील आहे. १५ वर्षांपूर्वी नरखेड येथील बोलोना गावात ते मंजुरीसाठी स्थायिक झाले. झोपडी करून येथेच राहत होते. आई वडील मजुरीसाठी गेले असता घरा समोरील नराधम आरोपी प्रेमलाल रामचंद्र कळंबे याने घरात घुसून आतून कडी लावून बालीकेच्या बलात्कार केला. नराधम लग्न झालेला आहे. त्याला मुलं आहेत. पिडीत मुलगी अल्पवयीन १२ वर्षिय आहे.
आदिवासी गोंड असल्याचा, गावात एकच घर असल्याचा नराधमाने फायदा घेत आदिवासी समूहाच्या मुलीचे आयुष्य बरबाद केलं.अट्रोसिटी ऍक्ट,बलात्कार, पोक्सो अंतर्गत आरोपीवर कार्यवाही झालेली आहे परंतु आरोपीला अद्याप कोणाच्या दबावामुळे अटक झाली नाही? असा प्रश्न ऑल इंडिया पँथर सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी विचारला आहे. त्यांनी पुढे म्हणाले की, सरकारकडे मागणी करते की तात्काळ आरोपीला अटक करा, पीडित मुलीच समुपदेशन करून पुनर्वसन करा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी झालीच पाहिजे.
आरोपीला तात्काळ अटक व्हावी म्हणून ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी पोलीस स्टेशनला पोहोचले असून नागपूरचे युवा नेते शुभम गोंडाने व कार्यकर्ते यंत्रणेवर दबाव टाकुन लवकरात लवकर आरोपीला अटक करावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे!