Breaking News

तिस-या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते

नागपूर, दि.३: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये तिसऱ्या फेरीअखेर एकूण ८४ हजार मतांपैकी ७ हजार २२८ अवैध व ७६ हजार ७७२ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत.

अभिजीत वंजारी ३५ हजार ५०९, संदीप जोशी २५ हजार ८९८, राजेंद्रकुमार चौधरी १४९, इंजीनियर राहुल वानखेडे २हजार ३२३, ॲङ सुनिता पाटील ९५, अतुलकुमार खोब्रागडे ५ हजार ७५७, अमित मेश्राम ४२, प्रशांत डेकाटे ९०३, नितीन रोंघे ३१५, नितेश कराळे ४ हजार ३१४, डॉ. प्रकाश रामटेके १०२, बबन तायवाडे ६२, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ३९, सी.ए. राजेंद्र भुतडा ९८७, प्रा.डॉ. विनोद राऊत १०४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ४८, शरद जीवतोडे २४, प्रा.संगीता बढे ६१ आणि इंजीनियर संजय नासरे ४० मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी होत आहे. चौथ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved