Breaking News

विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न केल्यामुळे द्वितीय क्रमांकाच्या मतमोजणीला प्रारंभ

नागपूर, दि.३: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये पाचव्या फेरीअखेर विजयी होण्यासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील भाग क्रमांक दोनला सुरुवात झाली. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीला पहाटे सुरुवात करण्यात आली आहे.

पाचव्या फेरीअखेर एकूण १ लाख ३३ हजार ५३ मतांपैकी ११ हजार ५६० अवैध व १ लाख २१ हजार ४९३ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत.

अभिजीत वंजारी ५५ हजार ९४७, संदीप जोशी ४१ हजार ५४०, राजेंद्रकुमार चौधरी २३३, इंजीनियर राहुल वानखेडे ३ हजार ७५२, ॲङ सुनिता पाटील २०७, अतुलकुमार खोब्रागडे ८ हजार ४९९, अमित मेश्राम ५८, प्रशांत डेकाटे १ हजार ५१८, नितीन रोंघे ५२२, नितेश कराळे ६ हजार ८८९, डॉ. प्रकाश रामटेके १८९, बबन तायवाडे ८८, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ६१, सी.ए. राजेंद्र भुतडा १ हजार ५३७, प्रा.डॉ. विनोद राऊत १७४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ६६, शरद जीवतोडे ३७, प्रा.संगीता बढे १२० आणि इंजीनियर संजय नासरे ५६ मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी होत होती.

तथापि, पाचव्या फेरीमध्ये उर्वरित २१ हजार ५३ मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एकूण वैध मते १ लक्ष २१ हजार ४९३ ठरली. ११ हजार ५६० मते अवैध ठरली. पाचव्या फेरीनंतर एकाही उमेदवाराने मतदानाचा कोटा पूर्ण केला नाही. त्यामुळे दुस-या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved