12 व 13 डिसेंबर रोजी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन
नागपूर, दि. 10 : कोरोनाच्या संकटात अनेकांचा रोजगार हिरावला गेला होता. यातून अनेकांना दिलासा मिळणार आहे. महारोजगार मेळाव्याने महास्वयम ॲपद्वारे क्लिकवर नागपूर शहरात 6 हजार 564 नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. नागपूर विभागात तब्बल 8 हजार890 इतक्या संधींद्वारे बेरोजगारांसाठी नोकरीची दारे उघडणार आहेत. यासाठी बेरोजगारांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाद्वारे करण्यात आले आहे.
उच्चशिक्षित उमेदवारांपासून ते अशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असून डॉक्टर, नर्स, रुमबॉय, एचआर, मॅनेजर, गार्ड पर्यंत तसेच आयटीआय प्रशिक्षण प्राप्त टर्नर, फिटर, प्लंबर, मशिनिस्ट, मोटार मॅकनिक, डिझेल मॅकेनिक, सीएनसी ऑपरेटर, ब्रायलर अटेंडंट, कुशल व अकुशल कामगार, तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकी पदवी, कृषी पदवीधर, व्यवस्थापनातील पदवी, लेखापाल इत्यादी विविध क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
येत्या 12 व 13 डिसेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याअनुषंगाने आयुक्तालयामार्फत http//www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर रोजगार मेळाव्याचा आयोजन करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून 1 लाख उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये नागपूर विभागाला 8 हजार 500 उमेदवारांचे लक्ष्य दिलेले असून नागपूर शहराला 4 हजार उमेदवारांचे लक्ष्य दिलेले आहे.
उच्चशिक्षित उमेदवारांपासून ते अशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या हमखास संधी प्राप्त होणार असून डॉक्टर, नर्स, रुमबॉय, एचआर, मॅनेजर, गार्ड पर्यंत तसेच आयटीआय प्रशिक्षण प्राप्त टर्नर, फिटर, प्लंबर, मशिनिस्ट, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, सीएनसी ऑपरेटर, ब्रायलर अटेंडंट, कुशल व अकुशल कामगार, तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकी पदवी, कृषी पदवीधर, व्यवस्थापनातील पदवी, लेखापाल इत्यादी विविध क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
राज्यात साधारणत: एक लक्षपेक्षा अधिक बेरोजगार उमेदवारांना या महारोजगार मेळाव्यातून रोजगार उपलब्ध करुन देण्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी आश्वस्त केले आहे. स्मार्ट फोन वापरणारे उमेदवार महास्वयम ॲप (Mahaswayamapp) डाऊनलोड करुन सुद्धा या सुविधांचा लाभ घेवू शकतो. विशेष म्हणजे मेळाव्यासाठी कोणतेही शुल्क नसून या मेळाव्यात उमेदवरांना मोफत सहभाग घेता येईल.
तरी उपलब्ध रोजगार संधीनुसार विभागातील व जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्या माध्यमातून आालेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी केले आहे.