
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिवसेनदिवस महिलावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्यशासनाने नवीन कायदा निर्माण केलेला आहे जेणेकरून यापुढे निर्भयासारखा गुन्हा पुन्हा राज्यात घडूनये, जर घडल्यास आरोपीस एक महिन्याच्या आत शिक्षा होणार आहे. याशिवाय समाजमाध्यमावर महिलांची बदनामी करणे, विनयभंग करणे, ऍसिड हल्ला करणे यासारखे गुन्हे अजामीनपात्र होणार आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात या कायद्या संबंधीच विधेयक गृहमंत्री अनिल देशमुख विधानसभेत मांडणार आहे. हे सारे खटले एका महिन्याच्या आत निकाली काढण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र तपास यंत्रणा व स्वतंत्र न्यायालये स्थापन करण्यात येणार आहे.
हा कायदा अतिशय महत्वाचा असून आंध्रप्रदेशच्या धर्तीवर असा नविन कायदा तयार करण्यात आला आहे. वरोरा मतदारसंघाच्या आमदार सौ.प्रतिभा धानोरकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न विधिमंडळात लावून धरला होता. आंध्रप्रदेशच्या धर्तीवर असा हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा यासाठी सर्वप्रथम मागणी करणारे आमदार सौ.प्रतिभा धानोरकर यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा कायदा समजून घेण्यासाठी आंध्रप्रदेशचा दौरा केला.
त्यानुसार आता महाराष्ट्रातही हा नविन कायदा लागू होणार आहे, त्यामुळे सर्व स्तरातून आमदार सौ.प्रतिभा धानोरकर यांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे. अल्पावधीत आमदार धोनोरकर यांनी महिलांचे अनेक प्रश्न विधिमंडळात लावून धरल्याने महिलांच्या प्रश्नासंबंधी जागरूक आमदार म्हणून त्यांची लोकप्रियता अधिक वाढत आहे.