
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
बल्लारपूर :- बिबट्याने कामगारावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारला रात्रो १० ते १०:३० वाजताच्या सुमारास घडली आहे, विश्वास उध्दव गिरसावळे वय ३६ राहणार विसापूर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, विश्वास हा बल्लारपूर पेपरमिल मधुन आपली २ ते १० ड्युटी आटोपून आपल्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला असता पेपरमिल वसाहत पार झाल्यावर झाड झुडुपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने विश्वासाच्या दुचाकीवर झडप घेतली, मात्र आरडाओरडा करून विश्वासने बिबट्याला हुसकावून लावले झालेल्या हल्ल्यात विश्वासाच्या डाव्या खांद्यावर गंभीर जखम झाली जखमी अवस्थेत विश्वासला विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले व प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले या घटनेची माहिती अधिकारी मा.संतोष थिपे यांना देण्यात आली असून वनपरिक्षेत्र वनरक्षक टेकाम यांनी हल्ल्यात जखमी कामगारांची चौकशी केली आहे.
विशेष बाब म्हणजे बल्लारपूर पेपरमिल वसाहतीला लागून जुन्या पॉवर हाऊस परिसरात फार मोठ्या प्रमाणावर झुडपी जंगल वाढले असून बल्लारपूर पेपर मिल कामगाराच्या माहितीनुसार या परिसरात एक वाघ व एक बिबट्या सोबत त्यांच्या पिल्ल्याचे वास्तव्य आहे शिवाय कामगाराना या वन्य प्राण्यांचे दर्शन झाले आहे, त्यामुळे पेपरमिल उद्योगातील कामगार रात्रपाळीत कामावर येण्यास घाबरतात त्यामुळे वनविभाग, पेपरमिल व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.